भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे तिच्या घरावर, ती ज्या शाळेत शिक्षिका आहे त्या शाळेवर मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम आहे. तिथे शूट करत असताना कावेरी म्हणजेच तन्वीने आणि सेटवरील बाकीच्या सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केलेली आहे. त्यातलेच काही हे फोटोज. तन्वीचा मालिकेतील लुक, कावेरी आणि राजवर्धनची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.